HomeTrendingफक्त साडे तीन हजारांत तुमचा होईल 50MP कॅमेरा असलेला Redmi फोन

फक्त साडे तीन हजारांत तुमचा होईल 50MP कॅमेरा असलेला Redmi फोन

Redmi 10 Prime स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी, 6GB RAM, 90Hz रिफ्रेश रेट आणि 50MP कॅमेरा असे भन्नाट स्पेसिफिकेशन्स आहेत. तरीही हा फोन खास ऑफरमुले फक्त 3,500 रुपयांमध्ये विकत घेण्याची संधी मिळत आहे.

यासाठी तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा फायदा घ्यावा लागेल. पुढे आम्ही याची सविस्तर माहिती दिली आहे.

शाओमीच्या वेबसाईटवर Redmi 10 Prime स्मार्टफोनचा 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी असलेल्या मॉडेल 13,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. कंपनी Mi Exchange ऑफर अंतर्गत 10,500 रुपयांपर्यंतची सूट देत आहे. तुमच्या जुन्या फोनवर फुल एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास हा फोन फक्त 3,499 रुपयांमध्ये तुमचा होईल. तसेच आयसीआयसीआय बँकेच्या कार्डनं पेमेंट करून तुम्ही 1 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकता.

Redmi 10 Prime चे स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Redmi 10 Prime स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच होल कट-आऊटसह येणार हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 अस्पेक्ट रेशियोला सपोर्ट करतो. या डिस्प्लेला गोरिल्ला ग्लास 3 ची सुरक्षा देण्यात आली आहे. सिक्योरिटीसाठी यात उजव्या पॅनलवर पावर बटनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच यात ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 5, Bluetooth 5.0, GPS, IR blaster, Qj 3.5mm ऑडियो जॅक असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन देण्यात आले आहेत.

या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G88 SoC आहे. या रेडमी फोनमध्ये 6GB पर्यंतचा LPDDR4x RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन 2GB एक्सपांडेबल रॅमला सपोर्ट करतो. हा बजेट स्मार्टफोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टम आधारित MIUI 12.5 वर चालतो. Redmi 10 Prime चा आकार 161.95 X 75.57 X 9.56 मिमी आणि वजन 192 ग्राम आहे.

Smart News:-
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular